डी-अॅडिक्शन आउटरीच मिशन नाशिक:
पहिला टप्पा - युवा सक्षमीकरण
स्वातंत्र्य शक्य आहे…
जागतिक आरोग्य संघटना आणि ए एम ए यांनी खूप पूर्वीच मद्यपाश आणि नशापाश यांना एक आजार म्हणून घोषित केले आहे..
हा जगातील तिसरा सर्वात प्राणघातक आजार आहे.
आमच्या उपक्रमाचा उद्देश पुढील घटकांना मदतीचा हात देण्याचा आहे…
१) मद्यपीडित आणि नशापीडितांना सुधारणेच्या मार्गावर आणून आनंदी जीवन पुन्हा मिळवून देणे.
2) मद्यपीडित आणि नशापीडितांच्या परिवार सदस्यांना, मित्रांना, संबंधितांना पुनर्प्राप्तीसाठी सहाय्य प्रदान करणे.
नाशिकच्या सर्व नागरिकांना नमस्कार...

अल्कोहोलिझम अँड अॅडिक्शन रिकव्हरी कॅम्पेन

मान. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अँड कलेक्टर, नाशिक

मान. कमिशनर ऑफ पोलीस, नाशिक

मान. कार्पोरेशन कमिशनर नाशिक

मान. डेप्युटी डायरेक्टर, हेल्थ सर्व्हिसेस, नाशिक

मान. ऍडमिन ऑफिसर, शिक्षण, म. न. पा., नाशिक
डी अॅडिक्शन आउटरीच मिशन
रीझन : जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन मेडिकल असोसिएशन यांनी फार पूर्वीच मद्यपाश आणि नशापाश याला एक आजार म्हणून घोषित केले आहे, जो जागतिक स्तरावर सर्वात शक्तिशाली प्राणघातक आजार म्हणून उदयास येत आहे. आजपर्यंत यावर कोणताही परिपूर्ण इलाज नाही. आम्ही या आजाराचे नेमके स्वरूप अनुभवले आहे. आम्ही प्रयत्न केले असून विविध साधनांचा वापर करून प्रयोग केले आहेत. आम्हाला हे समजले आहे की अॅक्टिव्ह रिकव्हरी प्रोग्रॅम मद्य/नशा मुक्ती आणि जीवन सुरळीत करण्यासाठी मदत करू शकतो. हेच डी-अॅडिक्शन आउटरीच मिशन राबवण्यामागचे प्रामाणिक रीझन आहे..
व्हिजन : मद्यपाश आणि नशापाश यासारख्या आजारांविरुद्ध लढणाऱ्यांच्या प्रयत्नांना आणि कार्यांना बळकट करणे, ही आमच्या उपक्रमामागील व्हिजन आहे. पीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य ज्ञान व जागरूकता देऊन त्यांना आनंदी जीवनाकडे परत आणणे, हे आमचे ध्येय आहे..
मिशन : आमच्या ध्येयामध्ये मद्य/नशा मुक्तीचे तीन टप्पे समाविष्ट आहेत. पहिला टप्पा म्हणजे पीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये सत्य, स्वरूप आणि स्वातंत्र्याच्या उपायांबद्दल जागरूकता पसरवणे. दुसरा टप्पा म्हणजे मद्य/नशा मुक्तीच्या उपायांसाठी समुपदेशन प्रदान करणे. आणि तिसरा टप्पा म्हणजे अॅक्टिव्ह रिकव्हरी प्रोग्रॅमद्वारे मद्य/नशा मुक्ती प्राप्त करण्यास मदत करणे..
प्रोग्रेशन : हे मिशन तीन स्तरांमध्ये आखले असल्यामुळे, त्याची कार्यरचना खालीलप्रमाणे आहे: (1) विनर जीन कॉन्सर्ट – लव्ह युअर जिंदगी. या कॉन्सर्टमध्ये मद्यपाश आणि नशापाश या आजाराचे सत्य, स्वरूप आणि त्यावरील उपायांबद्दल चर्चा केली जाते. (2) पीडित व्यक्तींसाठी समुपदेशन सुविधा. (3) आधार गटांच्या माध्यमातून अॅक्टिव्ह रिकव्हरी प्रोग्रॅम द्वारे , जिथे पीडित व्यक्तींना बरे होण्यासाठी, आपले जीवन पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आणि त्यात नवचैतन्य आणण्यासाठी आशा, शक्ती आणि धैर्य मिळू शकेल.
एएआरसी : विनर जीन कॉन्सर्ट... लव्ह युअर जिंदगी
विषय : मद्यपाश आणि नशापाश या आजाराचे नेमके स्वरूप | आजाराचे सत्य | आजाराची कार्यप्रणाली | आजारावरील मुक्ती उपाय
ठळक वैशिष्ट्ये: सुमधुर गाणी, स्पंदनशील कविता, प्रेरणादायी अनुभव आणि हृदयस्पर्शी कथांनी सजलेले.
कालावधी : ४५ मिनिटे
प्रेक्षक : विद्यार्थी आणि १५ वर्षांवरील सर्व
शाळा आणि महाविद्यालये : आपली वेळ येथे आरक्षित करा
एएआरसी : अॅक्टिव्ह रिकव्हरी कौन्सेलिंग...
जे लोक मद्य किंवा मादक पदार्थांपासून दूर राहू इच्छितात, त्यांचे स्वागत आहे.
कौन्सेलिंग सेशन गोपनीय असतात. पीडित व्यक्तीला निर्णय घेता यावा यासाठी सूचना, दैनंदिन उपाय आणि आधार दिला जातो..
या कौन्सेलिंग सेशनमध्ये पुढील मर्यादांचे काटेकोरपणे पालन केले जाते….
(1) अनामिकता हे मूलभूत तत्व आहे.
(2) स्वीकार ही मूलभूत गुरुकिल्ली आहे.
(3) कृती हाच जादुई शब्द आहे.
एएआरसी : अॅक्टिव्ह रिकव्हरी प्रोग्रॅम...
जे लोक मद्य किंवा मादक पदार्थांपासून मनापासून दूर राहू इच्छितात, त्यांचे स्वागत आहे.
अॅक्टिव्ह रिकव्हरी प्रोग्रॅम (ए आर पी) ही आजाराचे नेमके स्वरूप जाणून घेण्यासाठीची एक सात-स्तरांची संरचित प्रक्रिया आहे.
पीडित मद्यपीडित व नशापीडित आपले स्वतःचे अनुभव व्यक्त करण्यासाठी आणि इतरांच्या अनुभवांमधून स्वतःसाठी उपयुक्त सार घेण्यासाठी स्वेच्छेने एकत्र येतात.
टप्प्याटप्प्याने सात स्तर प्रदान केले जातात, जे मनाची शांतता, विचारांची स्थिरता आणि हृदयाची प्रसन्नता पुन्हा प्राप्त करण्यास मदत करतात..
यामुळे स्वतःचे मानसिक स्वास्थ्य, कौटुंबिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा पुनर्स्थापित होण्यास मदत होते.
संकोच करू नका... आत्ताच जॉईन व्हा.
जीवन सुंदर आहे. फक्त ते सुंदर कसे करायचे हे जाणून घेण्याची गरज आहे. जीवन सुंदर बनवणे सोपे आहे… फक्त ते सुंदर बनवण्याची सुरुवात करायची आहे.
- सुरभी, कलानगर, नाशिक ४२२००९. महाराष्ट्र भारत..
- help@daom.website
- येथे विनामूल्य सामील व्हा
